About Mrs. Anagha Kiran Purandare
सौ.अनघा किरण पुरंदरे, ह्या श्री. किरण पुरंदरे यांच्या सुविद्य पत्नी, निसर्गवेध न्यासाच्या संचालिका. गेली ५०/५२ वर्षे श्री. व सौ. पुरंदरे पुण्यात वास्तव्यास होते.
सौ.अनघा, अकाउंट्स, ऑडिटर, taxetion ची प्रॅक्टिस करत होत्या. मुलगी सई, ही बंगलोरला स्थाईक झाल्यावर, ५ वर्षापूर्वी उभयतानी कायमचे पुणे शहर सोडून , नागपूर जवळच्या भंडारा जिल्ह्यात असलेल्या पिटेझरी या गोंड आदिवासी गावात छोटे घर बांधून कायमचे राहण्याचा धाडसी निर्णय घेतला.सौ.अनघा किरण पुरंदरे यांनी गोंड आदिवासी महिलांना रोजगार मिळावा, त्या स्वावलंबी सक्षम व्हाव्या आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचे जंगलावरचे अवलंबन कमी व्हावे,मुख्यत्वे प्लास्टिक ला पर्याय म्हणून कापडी पिशव्या तयार कराव्यात,असा विचार केला.निसर्ग वेध न्यासा अंतर्गत “सखी महिला बचत गट ” स्थापन केला. या प्रकल्पात ६०/६२ प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात, त्यामध्ये (जीन्स डेनिम नवीन कापडाच्या पर्स, मोबाईल पाउच, पिशव्या,ट्रॅव्हल बॅग,पेन पाउच तसेच नवीन सुती साड्यांच्या गोधड्या, दुपटी, दुलया, फ्रीज मध्ये भाज्या ठेवण्यासाठी पिशव्या,बेडशीट टेबल क्लॉथ,ओढण्या ई…) यावर आदिवासी मुली सुंदर पेंटिंग करतात,आणि महिला या वस्तू शिवतात. त्यांना हे शिकवले आहे..
त्याचप्रमाणे या गावात, आणि त्याला लागून असलेल्या १०/१२ आदिवासी गावातील सेंद्रिय शेतीमधील उत्पादने उदा..( हळद, तिखट, जवस, तीळ, मोह फुले,डिंक, तूर डाळ,हरबरा डाळ, धने,मसाला,वाटाणा, मूग ई.) सखी बचत गटातर्फे विकत घेऊन शहरात पाठवली जातात. त्यासाठी वेब साईट,व्हॉटसअप,सोशल मीडिया ची मदत होते. त्यामुळे या गावातील महिलांना चांगले उत्पन्न मिळते.या सर्व म्हणजे, कापडी आणि फूड प्रॉडक्ट, नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या गेट जवळ सखी महिला बचत गटाचे सोविनियर शॉप आहे, तिथे विक्री केली जाते. साधारणपणे या प्रकल्पात ४० लाभार्थी आहेत. हा स्टॉल उभारण्यासाठी Emtech कंपनीने मोलाचे, आर्थिक सहाय्य केले.काही प्रमाणात या वस्तू परदेशात देखील विकल्या जातात. सौ.अनघा किरण पुरंदरे या उद्योजिका म्हणून गेली साडेचार वर्ष येथे काम करत आहेत. शहरांमधून मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाव्यात, म्हणून आम्ही नागपूर, मुंबई, नगर,पुणे अशा ठिकाणी प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन आदिवासी कला आणि सेंद्रिय उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न सौ.अनघा किरण पुरंदरे कायमच करत असतात.