- Dr. Wangari Mathai nursery
- Native fruiting trees
- Two saplings per head
- Number of beneficiaries – 10000
For the past 4 years, we have been growing Mango, Fanas, Mosambi, Orange, Lemon, Moh, Charoli, Shevga in the village of Pitezari (Taluka – Sakoli, District – Bhandara) and in about 25 villages in Sakoli, Lakhani and Sadak-Arjuni talukas by “Nisargavedh”. We are giving fruit trees such as Sitaphal, Ramphal, Pomegranate, Chiku, Amras, Guava, Jambhul, Banana, Kavath, Mulberry. These saplings are being enthusiastically planted by the local Gond tribals or Gowari, Powar, Kunbi, Sonar and many other communities. We give each person two saplings at a time. If the person plants these saplings properly, keeps them alive, grows them, then only then gives two more saplings. Generally, people plant such trees on the edge of their fields, near their houses, in wadis or in open spaces owned by themselves. The main thing is that young people are participating in this activity in large numbers. This picture is very promising. The trees planted by people in this way have now started bearing fruit. People are bringing home fruits as a gift to us very lovingly. These hundreds, thousands of trees will provide habitat not only to humans, but also to insects, butterflies, moths, frogs, mongooses, reptiles, birds and mammals. Will support. They are going to live.
We can see economy and ecology can be seen to be cleverly combined. That is why a gond friend sees a ‘big god’ in the moha tree. I see our ‘Vitthal’ in the mango tree. Bringing everyone closer from riddles to humans. Lover of Maya. It provides shade to sit in the afternoon. Gives sweet fruits. He placed his hand on his head in such a way that his eyes began to flow with happiness.
आम्ही “निसर्गवेध” संस्थेतर्फे गेली ४ वर्षे पिटेझरी (तालुका – साकोली, जिल्हा – भंडारा) या गावात तसंच साकोली, लाखनी आणि सडक-अर्जुनी तालुक्यांमध्ये असलेल्या सुमारे २५ गावांमध्ये आंबा, फणस, मोसंबी, संत्री, लिंबू, मोह, चारोळी, शेवगा, सीताफळ, रामफळ, डाळिंब, चिकू, आमरस, पेरू, जांभूळ, केळी, कवठ, तुती अशी फळझाडं देत आहोत. ही झाडं स्थानिक गोंड आदिवासी किंवा गोवारी, पोवार, कुणबी, सोनार अशा इतर अनेक समाजांचे लोक उत्साहानं लावत आहेत. आम्ही प्रत्येक व्यक्तीला एका वेळेस दोन झाडं देतो. ही झाडं त्या व्यक्तीने नीट लावली, जगवली, वाढवली की नंतरच आणखी दोन झाडं देतो. साधारणपणे अशी झाडं लोक त्यांच्या शेतांच्या धुऱ्यावर, घराच्या जवळ, वाडीत किंवा स्वत:च्या मालकीच्या मोकळ्या जागेत लावतात. मुख्य म्हणजे या उपक्रमात तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. हे चित्र खूप आशादायक आहे. अशा प्रकारे लोकांनी लावलेल्या झाडांना आता फळं यायला सुरुवात झाली आहे. लोक आम्हाला अत्यंत प्रेमानं भेट म्हणून घरी फळं आणून देत आहेत. पुढील दोन वर्षांत तर कमाल होणार आहे. कारण तेव्हा एकदम शेकडो झाडांना फळं धरणार आहेत. ही शेकडो, हजारो झाडं केवळ माणसालाच नाही, तर कीटक, फुलपाखरं, पतंग, बेडूक, गोम (घोण), पैसा, सरपकिटरू, पक्षी आणि सस्तन प्राण्यांनादेखील अधिवास देणार आहेत. आधार देणार आहेत. त्यांना जगवणार आहेत.
झाडामध्ये इकॉनॉमी आणि इकॉलॉजी यांचा चपखल मिलाफ झालेला दिसतो. म्हणूनच एखाद्या गोंड मित्राला मोहाच्या झाडात ‘मोठा देव’ दिसतो. मला आंब्याच्या झाडात आपला ‘विठ्ठल’ दिसतो. किड्यामकोड्यांपासून माणसांपर्यंत सगळ्यांना जवळ करणारा. माया माया करणारा. तो दुपारी बसायला सावली देतो. गोड फळं देतो. त्यानं असा डोक्यावर हात ठेवला, की डोळे आनंदानं वाहायला लागतात.