“कसा कसा पानीऽऽ?” “असा पानीच नाई पायलूऽऽ!” “या पान्याना ठेवूनच दिलाऽऽ!” “मनमानी पानीऽऽ!”
धानाचा बांद्या आणि पलीकडे नागझिर्याचं जंगल
ऐकत रहावं असा ढाला आवाज असलेले मधुभाऊ मला पावसाबद्दल सांगत होते. हे सांगत असताना त्यांचा आवाज मोठा…
श्रावणातली एक कुंद दुपार. वारा पडला होता. कळकाचे कंचारे तेवढे शेंड्यात हलत होते. उष्णता आणि गदगद यांचे वार्षिक उच्चांक मोडू पाहणारा दिवस आमच्या वाट्याला आला होता! आम्ही मूळचे पुण्याचे. आमचं काही मोजू नका. पण गावातले…